सांगली, तासगाव, वाळवा व कुमठेत आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:49+5:302021-07-14T04:31:49+5:30
सांगली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत आज-मंगळवारी जिल्ह्यात ...

सांगली, तासगाव, वाळवा व कुमठेत आज रक्तदान शिबिर
सांगली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत आज-मंगळवारी जिल्ह्यात सांगली शहरासह तासगाव, वाळवा व कुमठे (ता. तासगाव) येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले आहे.
सांगलीमध्ये ‘लोकमत’ व ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’ यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया हॉल, शांतिसागर कॉलनी, धामणी रोड, सांगली येथे सकाळी १० ते ४ या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरात रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीच्या सदस्यांबरोबर सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे अध्यक्ष अर्जुन भिसे यांनी केले आहे.
कुमठे (ता. तासगाव) येथे ‘लोकमत’ व ग्रामपंचायत, कुमठे यांच्यातर्फे ग्रामपंचायत परिसरात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन लोकनियुक्त सरपंच महेश पाटील यांनी केले आहे.
वाळवा येथे सर्वपक्षीय कृती समिती व ‘लोकमत’तर्फे जिल्हा परिषद शाळा नंबर २, हुतात्मा चौक येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संयाेजकांकडून करण्यात आले आहे.
तासगाव येथे एलआयसी गोल्डन परिवार व ‘लाेकमत’ यांच्यातर्फे तासगाव येथील एलआयसी कार्यालयात दुपारी १२ ते ४ या वेळेत रक्तदान शिबिर हाेणार आहे. शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.