तासगावमध्ये वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:58+5:302021-01-20T04:26:58+5:30
यावेळी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले, सध्याच्या कोविड-१९ च्या काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्ण दगावत असताना महाविद्यालयात एनसीसी व एनएसएसच्या ...

तासगावमध्ये वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबिर
यावेळी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले, सध्याच्या कोविड-१९ च्या काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्ण दगावत असताना महाविद्यालयात एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी कर्तव्यभावनेने घेतलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ‘ज्ञानशिदोरी दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्या अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट दिले, तर निवृत्त प्राध्यापक जी. के. पाटील यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ इतिहास विभागातील (बीए व एमए) प्रथम विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीची घोषणा केली. वीस हजार रुपये किमतीचा धनादेश त्यांनी यावेळी डॉ. हुजरे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी पद्मभूषण वसंतरावदादा पाटील शासकीय रुग्णालय रक्तपेढी सांगली येथील डॉ. महेश गायकवाड कार्यक्रम अधिकारी डॉ. टी. के. बदामे, लेफ्टनंट डॉ. विनोदकुमार कुंभार, प्रा. अण्णासाहेब बागल, डॉ. अमोल सोनवले, डॉ. पी. बी. तेली, ए. एस. पाचोरे, उपप्राचार्य डॉ. एस. के. खाडे, नॅक समन्वयक डॉ. एस. एस. पाटील, अधीक्षक एम. बी. कदम उपस्थित होते.
फाेटाे : १९ तासगाव १