वीर सेवा दलातर्फे वाळवा येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:40 IST2020-12-16T04:40:19+5:302020-12-16T04:40:19+5:30

वाळवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्तसाठा कमी असल्याने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत वीर सेवा ...

Blood donation camp at Valva by Veer Seva Dal | वीर सेवा दलातर्फे वाळवा येथे रक्तदान शिबिर

वीर सेवा दलातर्फे वाळवा येथे रक्तदान शिबिर

वाळवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्तसाठा कमी असल्याने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी वीर सेवा दलाच्या शाखांच्या माध्यमातून रक्तसंकलनाचे आवाहन केले हाेते. त्याला प्रतिसाद देत वाळवा हाळभाग शाखेने रक्तदान शिबिर घेऊन पन्नास बाटल्या रक्तसंकलन केले.

वाळवा येथील जैन मंदिर सभागृहात वीर सेवा दलाच्या वाळवा शाखेच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. एमएसआय ब्लड बँक, मिरज यांच्या सहकार्याने डाॅ. ॠतुजा पुजारी, स्नेहल जमगी, ऐश्वर्या खाडे, संतोष नांगरे, दयानंद गुरव, स्मिता सगरे यांनी रक्तसंकलन केले. त्यांचा सन्मान बजरंग गावडे, अजित भिलवडे, महावीर वाजे, संदीप भिलवडे, राहुल कोले यांनी केला. मनोज भिलवडे, रतन हिंगणे, अमीत नवले, प्रकाश मेटकरी, महावीर वाजे, सुहास पाटील, तुषार हिंगणे, संघनायक संदीप भिलवडे यांनी संयोजन केले.

Web Title: Blood donation camp at Valva by Veer Seva Dal