तुपारी येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST2021-04-23T04:28:34+5:302021-04-23T04:28:34+5:30

सावंतपूर : तुपारी येथील मोहनभाऊ पाटील प्रतिष्ठानने रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तासाठी हातभार लावला आहे. या ...

Blood donation camp at Tupari | तुपारी येथे रक्तदान शिबिर

तुपारी येथे रक्तदान शिबिर

सावंतपूर : तुपारी येथील मोहनभाऊ पाटील प्रतिष्ठानने रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तासाठी हातभार लावला आहे. या प्रतिष्ठानचा आदर्श स्वयंसेवी संस्थांनी घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी केले.

तुपारी (ता. पलूस) येथे मोहनभाऊ पाटील प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन लाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे शिबिर भारती विद्यापीठ रक्तपेढीच्या सहकार्याने घेण्यात आले. यावेळी विश्वतेज संजय पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. पतंगराव कदम खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, राजाराम पाटील, माजी उपसभापती संजय पाटील, गोरख घाडगे, नितीन पाटील, सरपंच सुरेखा राक्षे, उपसरपंच सुनील पाटील, वसंत पाटील उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp at Tupari