रेठरे हरणाक्ष येथे आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:13+5:302021-07-17T04:21:13+5:30
शिरटे : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे ‘लोकमत’, राजारामबापू पाटील ब्लड बँक इस्लामपूर, पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था, चौंडेश्वरी ...

रेठरे हरणाक्ष येथे आज रक्तदान शिबिर
शिरटे : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे ‘लोकमत’, राजारामबापू पाटील ब्लड बँक इस्लामपूर, पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था, चौंडेश्वरी महिला ज्येष्ठ नागरिक संघटना व समाजसेवक बाळासाहेब कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार १७ रोजी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवदान मिळणार आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी २८ दिवसांनंतर याशिवाय लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी व रक्तदात्यांनी रक्तदान करून १० मिनिटात लसीकरण केले तरी चालते. तरी रेठरे हरणाक्ष परिसरातील इच्छुकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या रक्तदान महायज्ञात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ‘लोकमत’चे प्रशस्तीपत्र, राजारामबापू ब्लड बँकेचे प्रशस्तीपत्र मिळणार आहे. रक्तदानासाठी लाेकमतचे प्रतिनिधी अशोक पाटील, निवास पवार यांच्यासह जगन्नाथ मोरे-पाटील, बाळासाहेब कांबळे, डी.के. मोरे, चंद्रशेखर मोरे, निवास शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.