शुभम् पाटील यांच्या वाढदिनी येळावीत रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:33 IST2021-08-18T04:33:11+5:302021-08-18T04:33:11+5:30

ओळ : येळावी (ता. तासगाव) येथे शुभम् पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. लाेकमत न्यूज ...

Blood donation camp on Shubham Patil's birthday | शुभम् पाटील यांच्या वाढदिनी येळावीत रक्तदान शिबिर

शुभम् पाटील यांच्या वाढदिनी येळावीत रक्तदान शिबिर

ओळ : येळावी (ता. तासगाव) येथे शुभम् पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथे सामाजिक कार्यकर्ते शुभम पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण आणि सॅनिटायझर व मास्कचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत निरंकारी मंडळाचे खानापूर संयाेजक दत्तात्रय जगताप महाराज होते.

यानिमित्ताने आयाेजित रक्तदान शिबिरात ५७ दात्यांनी रक्तदान केले. नागरिकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. परिसरात वृक्षारोपण करून गोविंद वृद्ध सेवा आश्रम येथे जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले. शुभम पाटील यांचे बंधू सागर पाटील यांनी वृद्धाश्रमास संपूर्ण फरशी घालून दिली.

Web Title: Blood donation camp on Shubham Patil's birthday