शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:19 IST2021-04-29T04:19:51+5:302021-04-29T04:19:51+5:30

सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने येत्या १ मे रोजी महाराष्ट्रदिनी सांगलीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती ...

Blood donation camp by Shiv Pratishthan Yuva Hindusthan | शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे रक्तदान शिबिर

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे रक्तदान शिबिर

सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने येत्या १ मे रोजी महाराष्ट्रदिनी सांगलीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले यांनी दिली.

माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात सकाळी दहा वाजता शिबिर होणार आहे. चौगुले म्हणाले की, देशभरात लसीकरण सुरू आहे. वास्तविक लसीकरणानंतर पुढील दोन महिने संबंधित व्यक्तीला रक्तदान करता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्ताची टंचाई येत्या काही महिन्यांत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वसंतदादा सर्वोपचार रुग्णालय व हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक यांच्यामार्फत रक्तसंकलन करण्यात येणार आहे. सांगलीतील नागरिकांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन चौगुले यांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp by Shiv Pratishthan Yuva Hindusthan