भिलवडी जायंटस् ग्रुपच्यावतीने धुलिवंदनादिवशी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:08+5:302021-03-30T04:17:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी, जायंटस् सहेली व शंभूराजे युथ फाऊंडेशन माळवाडी यांच्यावतीने दिवंगत ...

भिलवडी जायंटस् ग्रुपच्यावतीने धुलिवंदनादिवशी रक्तदान शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी, जायंटस् सहेली व शंभूराजे युथ फाऊंडेशन माळवाडी यांच्यावतीने दिवंगत काकासाहेब चितळे यांच्या स्मरणार्थ औदुंबर येथे धुलिवंदनच्या निमित्ताने रक्तदान शिबिर झाले.
उद्योजक गिरीश चितळे यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. दिवंगत काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बावीस वर्षे ही चळवळ सुरू आहे. पस्तीस दात्यांनी रक्तदान केले. वसंतदादा पाटील रक्तपेढीने रक्तदानाचा स्वीकार केला. सौ. अपर्णा जोशी, वासुदेव जोशी, दत्ता उतळे यांनी मनोगत व्यक्त केले. जायंटस् ग्रुपचे अध्यक्ष के. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर डी. आर. कदम यांनी आभार मानले. यावेळी मकरंद चितळे, उत्तम मोकाशी, भगवानराव शिंदे, राजन कुलकर्णी, प्रा. आर. डी. पाटील, डॉ. सी. व्ही. कुलकर्णी, सुनील परीट, एच. आर. जोशी उपस्थित होते.
फोटो : औदुंबर येथे रक्तदान शिबिराप्रसंगी गिरीश चितळे, मकरंद चितळे, डी. आर. कदम, के. आर. पाटील, उत्तम मोकाशी, भगवानराव शिंदे आदी उपस्थित होते.