कुपवाडमध्ये युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:20 IST2021-05-03T04:20:54+5:302021-05-03T04:20:54+5:30
कुपवाड : शहरातील युवा शिवसेना आणि कापसे प्लॉट येथील छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर ...

कुपवाडमध्ये युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिर
कुपवाड : शहरातील युवा शिवसेना आणि कापसे प्लॉट येथील छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात परिसरातील पन्नास नागरिकांनी रक्तदान करत सामाजिक बांधीलकी जपली.
कुपवाड युवासेनेचे अध्यक्ष सुरेश साखळकर आणि सहकारी यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंभुराज काटकर, गुंठेवारी चळवळीचे नेते चंदन चव्हाण, काँग्रेसचे माजी नगरसेवक युनुस महात, शिवसेनेचे रूपेश मोकाशी, विठ्ठल संंकपाळ प्रमुख उपस्थित होते.
यावेळी रक्तदान शिबिरातील सहभागी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुरेश साखळकर म्हणाले की, सध्या कोरोना महामारीच्या काळात समाज बिकट परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तरुण मंडळांनी तुमच्या जवळच्या रक्तपेढीमध्ये जसे लागेल तसे रक्तदान करावे. कार्यक्रमास सुखदेव काळे, सचिन सरगर, अनिल शेटे, सुहास साखळकर, नाना करडे, शेखर ककमरे, सचिन गवळी, विनायक धारवाडे उपस्थित होते.
फोटो : ०२ कुपवाड १
ओळ : कुपवाडमध्ये युवासेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुरेश साखळकर, रूपेश मोकाशी, विठ्ठल संंकपाळ, सुखदेव काळे, सचिन सरगर उपस्थित होते.