औंढीत रक्तदान शिबिर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:57+5:302021-03-04T04:49:57+5:30

कोकरुड : औंढी (ता. शिराळा) येथे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान व उपचार शिबिर उत्साहात पार ...

Blood donation camp in Aundh in excitement | औंढीत रक्तदान शिबिर उत्साहात

औंढीत रक्तदान शिबिर उत्साहात

कोकरुड : औंढी (ता. शिराळा) येथे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान व उपचार शिबिर उत्साहात पार पडले. औंढी ग्रामपंचायत व प्रकाश हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर इस्लामपूर यांच्या वतीने आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. डॉ. प्रमोद चौगले, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. शकील मुल्ला, प्रतीक जगदाळे, प्रणाली तोरणे, शिवानी कांबळे, मीनल माने, सलोमी काळे, ऋषिकेश नाकील, शशिकांत चौगुले यांनी सहभाग घेतला होता. ग्रामसेवक अरुण रेळेकर व ग्रामस्थांनी संयोजन केले.

Web Title: Blood donation camp in Aundh in excitement