आष्ट्यात रक्तदान शिबिर; ८५ रक्तदात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST2021-02-05T07:17:46+5:302021-02-05T07:17:46+5:30

आष्टा : आष्टा शहर इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष स्नेहा माळी, ...

Blood donation camp in Ashta; Blood donation of 85 blood donors | आष्ट्यात रक्तदान शिबिर; ८५ रक्तदात्यांचे रक्तदान

आष्ट्यात रक्तदान शिबिर; ८५ रक्तदात्यांचे रक्तदान

आष्टा : आष्टा शहर इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष स्नेहा माळी, राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, उपनगराध्यक्ष तेजश्री बोंडे, अभियंता चंद्रकांत पाटील, यशोदीप करिअर अकॅडमीचे महेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

यावेळी शेरनवाब देवळे, मंगल सिद्ध, प्रतिभा पेटारे, संगीता सूर्यवंशी, पुष्पलता माळी, अध्यक्ष विजयकुमार माळी, उपाध्यक्ष नंदकुमार बसुगडे, प्रवीण महाजन, नूतन हालुंडे, वैभव थोटे, शिरीष सावंत, संजय रानमाळे, संकेत पाटील, उमेशचंद्र ओतारी उपस्थित होते. डॉ. प्रवीण वंजाळे रक्तपेढीने रक्तदान संकलन केले. यशोदीप करिअर अकॅडमीचे सहकार्य लाभले.

फोटो-०२आष्टा१

फोटो ओळ : आष्टा शहर इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी वैभव शिंदे, स्नेहा माळी, तेजश्री बोंडे ,चंद्रकांत पाटील, संजय रानमाळे, नूतन हालुंडे, प्रवीण महाजन, वैभव थोटे उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp in Ashta; Blood donation of 85 blood donors