विसावा मंडळाच्या शिबिरात ९० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:32+5:302021-04-12T04:24:32+5:30
सांगली : गावभागातील विसावा मंडळाने हुतात्मा बाबू गेनू स्मृतिप्रित्यर्थ आयोजित शिबिरात ९० दात्यांनी रक्तदान केले. उफक्रमाचे हे सलग ३६ ...

विसावा मंडळाच्या शिबिरात ९० जणांचे रक्तदान
सांगली : गावभागातील विसावा मंडळाने हुतात्मा बाबू गेनू स्मृतिप्रित्यर्थ आयोजित शिबिरात ९० दात्यांनी रक्तदान केले. उफक्रमाचे हे सलग ३६ वे वर्ष होते. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णामाई जलतरण संस्था, कृष्णामाई स्वच्छता अभियान, सरकार ग्रुप यांनी सहकार्य केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पवार, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सतीश साखळकर, मावळा प्रतिष्ठानचे ऋषिकेश पाटील, श्रुती कुलकर्णी, रामकृष्ण चितळे, गोपाळ मर्दा, हेमंत दिगडे आदी उपस्थित होते.
संयोजन संजय चव्हाण, भास्कर कुलकर्णी, सुहास चव्हाण, मिलिंद खाडिलकर, शिरीष चव्हाण, शुभम चव्हाण, प्रथमेश वैद्य, महेश खाडिलकर, अजिंक्य कुलकर्णी, समर्थ शेळके, श्रीराम चव्हाण, गणेश भोई, सोहम चव्हाण, नीरज चव्हाण, प्रथमेश पाटील, शार्दुल वसगडेकर, शुभम बापट, सोहम जोशी, यश कुलकर्णी, वृषभ वरद, नीरज वसगडेकर, निलम कुलकर्णी, सुयोग चिंदरकर आदींनी केले.