शिवणीत रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:16+5:302021-09-15T04:31:16+5:30
वांगी : शिवणी (ता. कडेगाव) येथील अंबिका गणेश मंडळातर्फे आयोजित शिबिरामध्ये ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन चिंचणी-वांगी ...

शिवणीत रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान
वांगी : शिवणी (ता. कडेगाव) येथील अंबिका गणेश मंडळातर्फे आयोजित शिबिरामध्ये ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन चिंचणी-वांगी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्याहस्ते केले.
शिवणी गावातील तरुण कार्यकर्ते यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. गावातील अंबिका तरुण मंडळाचे सदस्य, महिला, इतर मंडळाचे कार्यकर्ते अशा एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना कालावधीत शासन नियमांचे पालन करून रक्तदान शिबिर संपन्न झाले. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाने रक्त संकलन केले.
यावेळी माजी उपसरपंच विकास पवार, सरपंच संजय पवार, उपसरपंच दत्तात्रय चव्हाण, पोलीस पाटील बाळासाहेब पवार, डॉ. शुभम पवार, सूरज पवार, जगन्नाथ पवार, रोहित पवार, अनिल माने, वैभव पवार, दिग्विजय पवार, संभाजी पवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय डॉक्टर टीम उपस्थित होती.