पेठ येथील शिबिरात ३५ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:27 IST2021-04-16T04:27:56+5:302021-04-16T04:27:56+5:30

पेठ (ता. वाळवा) येथे रक्तदान शिबिरावेळी धनपाल माळी, विकास दाभोळे, सचिन कांबळे, जितेंद्र पवार उपस्थित होते. लोकमत न्यूज ...

Blood donation of 35 people in the camp at Peth | पेठ येथील शिबिरात ३५ जणांचे रक्तदान

पेठ येथील शिबिरात ३५ जणांचे रक्तदान

पेठ (ता. वाळवा) येथे रक्तदान शिबिरावेळी धनपाल माळी, विकास दाभोळे, सचिन कांबळे, जितेंद्र पवार उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल शाखा वाळवा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी व पोलीस ज्योती कांबळे, उपसरपंच चंद्रकांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण ब्लड बॅंक, कऱ्हाड यांनी रक्त संकलित केले. डॉ. विवेक चव्हाण, वंदना पाटील, वृषाली नलावडे यांचे सहकार्य केले. यावेळी दिनकर पवार, माजी सेवानिवृत्त सैनिक गुलाब पवार, तंटामुक्त अध्यक्ष धनपाल माळी, विकास दाभोळे, सचिन कांबळे, जितेंद्र पवार, मिलिंद माने, प्रा. राजेंद्र पवार, अनिकेत पवार, राजेंद्र पाटसुते आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation of 35 people in the camp at Peth