कसबे डिग्रजमध्ये ११० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:39+5:302021-01-13T05:09:39+5:30

कसबे डिग्रज : माजी जिल्हा परिषद सदस्य आणि वसंतदादा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते श्रीपाल चौगुले यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण ...

Blood donation of 110 people in Kasbe Digraj | कसबे डिग्रजमध्ये ११० जणांचे रक्तदान

कसबे डिग्रजमध्ये ११० जणांचे रक्तदान

कसबे डिग्रज : माजी जिल्हा परिषद सदस्य आणि वसंतदादा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते श्रीपाल चौगुले यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात ११० जणांनी रक्तदान केले.

मानस ब्लड बँक मिरज, सांगली यांच्या सहकार्यातून कसबे डिग्रज येथील आदिनाथ भवनमध्ये हे शिबिर घेण्यात आले. शिबिराचे संयोजन वीर सेवा दल, विशाल चौगुले युवा मंच यांनी केले. रक्तदान केलेल्या लोकांना प्रमाणपत्र, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, उपसरपंच सागर चव्हाण, दादासाहेब दुधगावे, माजी सरपंच राजेंद्र जाधव, आप्पा जाधव, शिवाजी वसगडे, शिवाजी पिंपळे, आण्णा घोदे, रमेश काशीद, विपुल चौगुले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी श्रीपाल चौगुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. विशाल चौगुले यांनी प्रास्ताविक केले. किरण पाटील यांनी आभार मानले.

फोटो : १२ कसबे डिग्रज १

ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील रक्तदान शिबिरात ११० युवकांनी रक्तदान केले

Web Title: Blood donation of 110 people in Kasbe Digraj