सांगलीत पोलिसांकडून पुन्हा नाकाबंदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:58+5:302021-06-27T04:17:58+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रातील कोरोनास्थिती कायम राहण्याबरोबरच आता जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश झाल्याने पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईस सुरुवात केली ...

सांगलीत पोलिसांकडून पुन्हा नाकाबंदी सुरू
सांगली : महापालिका क्षेत्रातील कोरोनास्थिती कायम राहण्याबरोबरच आता जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश झाल्याने पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईस सुरुवात केली आहे. गेल्या पंधरवड्यापासून पोलिसांकडून कारवाईस शिथिलता आली होती. मात्र, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असल्याने आता प्रमुख चौकांत पुन्हा नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे.
पंधरवड्यापूर्वी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सहा टक्क्यांवर आल्याने निर्बंध हटवत सर्व व्यवहारांना दुपारी चारपर्यंत परवानगी देण्यात आली होती. तरीही कोरोना रुग्णांची संख्या कायमच होती. त्यात या आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा जादा नोंदविला गेल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा निर्बंध वाढवत चौथ्या स्तरातील निर्बंध लागू केले आहेत. उद्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यात सध्या ‘वीकेंड लॉकडाऊन’अंतर्गत सर्व व्यवहार बंद असल्याने पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळपासून कारवाईस सुरुवात केली.
विजयनगर, विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक, कर्मवीर चौक, सिटी पोस्ट, कॉलेज कॉर्नर, कोल्हापूर रोड, माधवनगर रोड, लक्ष्मी मंदिर चौक आदी ठिकाणी पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. निर्बंध अधिक कडक करण्यात आल्याने सोमवारपासून कारवाईही अजून तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.