शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फाेट; चार घरे जळून खाक; अग्निशमन दलाचे चार कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 19:57 IST

आगीच्या झळा लागल्याने अग्निशमन दलातील चार कर्मचारी जखमी

सांगली : शहरातील पंचशीलनगर परिसरात गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटात चार घरे जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी दाखल झालेल्या महापालिकेच्या अग्निशमन दलातील चार कर्मचारी आगीच्या झळा लागल्याने जखमी झाले. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. या परिसरातील घरात कोणीही नागरिक नसल्याने जिवीतहानी टळली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.पंचशिलनगर येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठा शेजारी मेंडगुळे वस्ती आहे. या परिसरात रेल्वे मार्गाजवळच असलेल्या खुल्या जागेवर झोपडपट्टी आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास यातील नंदकुमार जावीर यांच्या घरात गॅसची गळती होऊन शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली.आग वाढतच चालल्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ अग्निशमन दलास याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे चार बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या चार घरात आठ सिलेंडर होते. अग्निशमनच्या जवानांनी तातडीने ऑपरेशन राबवत हे सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढले.

नेमके याचवेळी बंद असलेल्या नंदकुमार जावीर यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. आगीपाठोपाठ गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने उपस्थितांमध्ये धावपळ उडाली. या स्फोटात घराचा पत्रा लांबवर फेकला गेला. अचानकच झालेल्या या स्फोटामुळे आग शमविण्यासाठी आघाडीवर असलेले जवान जखमी झाले. या आगीत संग्राम जावीर, नंदकुमार जावीर, दगडू चवरे आणि विजय पडळकर यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfireआग