शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
2
'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
4
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
5
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
6
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
7
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?
8
टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड
9
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
10
“मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील
11
भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात
12
Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल
13
ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड
14
"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट
15
चीनची 'पॉवर परेड'! अण्वस्त्रे, समुद्री ड्रोन आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे
16
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा
17
पुतिन-जिनपिंग अन् किम यांचं अमेरिकेविरोधात षडयंत्र; चीनमधील परेड पाहून डोनाल्ड ट्रम्प संतापले
18
फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर
19
"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा

कवठेमहांकाळ कडकडीत बंद

By admin | Updated: December 24, 2015 00:36 IST

शिवसेना आक्रमक : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडा; भाजपवर टीका

कवठेमहांकाळ : म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बुधवारी कवठेमहांकाळ शहर बंद केले. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसैनिकांनी निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना मागणीचे निवेदन दिले. सध्या जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत; परंतु शासनाला जाग येत नाही. शासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहोत. या शासनाला धडा शिकवू, असे निवेदनात म्हटले आहे. वीज बिल भरल्यानंतर पाणी सोडू, असे भाजपचे नेते म्हणत आहेत. परंत, या नेत्यांनी शेतीला पाणीच दिले नाही. तालुक्यातील पिके करपून गेली आहेत. शेतकरी दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना, भाजप वीज बिल भरण्याची सक्ती करीत आहे. ही शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका असून पाणी सोडल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. आठ दिवसांत पाणी सोडले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला. व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद दिला. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी संजय चव्हाण, प्रकाश चव्हाण, महेश जाधव, अनिल बासर, गुंडा पोतदार, अनिल पाटील, रोहित पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)