शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

शिराळ्यात दोघा ‘भाऊं’मध्येच लढत; सम्राट महाडिक यांचे माघारीचे संकेत, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 17:58 IST

शिराळा : शिराळा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी अखेर उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता ...

शिराळा : शिराळा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी अखेर उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजप महायुतीचे सत्यजित देशमुख या दोघा ‘भाऊं’मध्येच मुख्य लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.मतदारसंघात शिराळा व वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. तेथे विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांना पाठबळ दिले आहे. २०१९ मध्ये शिवाजीराव नाईक भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी सत्यजित देशमुख त्यांच्यासोबत होते. त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. त्यांना ४६ हजार मते मिळाली होती. त्यांच्या बंडखोरीचा फटका भाजपला बसल्याचे स्पष्ट झाले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत यावेळीही फटका बसू नये याची काळजी भाजप श्रेष्ठींनी घेतली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत महाडिक कुटुंबीयांची मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. तेथील चर्चेअंती सम्राट महाडिक यांनी उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे महाडिक यांची ताकद सत्यजित देशमुख यांना मिळणार आहे.

दरम्यान, प्रचारसभा, गावभेटी, वैयक्तिक भेटी, कार्यकर्त्यांचे रुसवेफुगवे दूर करण्याची धडपड, नेत्यांच्या कोलांटउड्या यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. निनाईदेवी कारखान्याची विक्री, कागदावरच असणारे मागासवर्गीय वसतिगृह, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळाचा निधी अडविणे आदी मुद्द्यांवर सत्यजित देशमुख यांची कोंडी करण्याचा प्रयत्न नाईक गट करीत आहे, तर सत्यजित देशमुख यांनी विराज उद्योगसमूहातून स्वतःची प्रगती, नाईक यांची अजित पवार यांच्याशी सलगी आदी मुद्द्यांवर प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे.

२०१९च्या निवडणुकीतील उमेदवारनिहाय मते- मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - १,०१,९३३- शिवाजीराव नाईक (भाजप) - ७६,००२- सम्राट महाडिक (अपक्ष) - ४६,२३९

- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील शिराळा मतदारसंघातील स्थिती- धैर्यशील माने - ८०,७२०- सत्यजित पाटील - ९०,००१- राजू शेट्टी - १७,४९९

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shirala-acशिराळाBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024