आंबेवाडीच्या उपसरपंचपदी भाजपचे रघुनाथ धुमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:22 IST2020-12-25T04:22:45+5:302020-12-25T04:22:45+5:30

शिराळा : आंबेवाडी (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रघुनाथ शामराव धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी ...

BJP's Raghunath Dhumal as Deputy Panch of Ambewadi | आंबेवाडीच्या उपसरपंचपदी भाजपचे रघुनाथ धुमाळ

आंबेवाडीच्या उपसरपंचपदी भाजपचे रघुनाथ धुमाळ

शिराळा : आंबेवाडी (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रघुनाथ शामराव धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच पूनम भोसले यांनी काम पाहिले.

येथील राष्ट्रवादीच्या उपसरपंच उज्ज्वला जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. रघुनाथ धुमाळ यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. रघुनाथ धुमाळ यांचा सरपंच पूनम भोसले यांनी सत्कार केला.

यावेळी प्रतिभा चव्हाण, गंगुबाई भोसले, ग्रामसेवक दिलीप डवरी, माजी सरपंच जगन्नाथ भोसले, उपसरपंच अशोक चव्हाण, तंटामुक्तचे अध्यक्ष सचिन चव्हाण, बाबाजी चव्हाण, सुभाष धुमाळ, अमोल चव्हाण, पांडुरंग भोसले, कोंडीबा चव्हाण, ओंकार काळे, धोंडीबा चव्हाण उपस्थित होते.

फोटो-२४शिराळा०१

फोटो ओळ : आंबेवाडी (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीचे नूतन उपसरपंच रघुनाथ धुमाळ यांचा सरपंच पूनम भोसले यांनी सत्कार केला.

Web Title: BJP's Raghunath Dhumal as Deputy Panch of Ambewadi