मिरजेत रस्ते कामाबद्दल आमदारांच्या प्रतिमेस भाजपचा दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:57+5:302021-09-26T04:28:57+5:30
मिरज : मिरजेतील अनेक वर्षे प्रलंबित छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाल्याने आ. सुरेश खाडे यांच्या प्रतिमेस गढूळ ...

मिरजेत रस्ते कामाबद्दल आमदारांच्या प्रतिमेस भाजपचा दुग्धाभिषेक
मिरज : मिरजेतील अनेक वर्षे प्रलंबित छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाल्याने आ. सुरेश खाडे यांच्या प्रतिमेस गढूळ पाण्याने अभिषेकाच्या कृत्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपतर्फे खाडे यांचे प्रतिमेस शनिवारी दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मिरज शहर भाजप, शहर सुधार समितीतर्फे गांधी चौकात जल्लोष करण्यात आला.
यावेळी भाजप व सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून व पेढे साखर वाटून आनंद व्यक्त केला. आ. खाडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. प्रलंबित महामार्गाच्या कामाचा प्रारंभ करून आ. खाडे यांनी राष्ट्रवादीच्या कृत्यास उत्तर दिल्याचे शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांनी सांगितले.
यावेळी गजेंद्र कुळ्ळोळी, उमेश हारगे, शाशिकांत वाघमोडे, विठ्ठल खोत, जयगोंड कोरे, ओंकार शुक्ल, परशुराम नागरगोजे, सुमेध ठाणेदार, मोहन वाटवे, सुधार समितीचे तात्या परदेशी, अल्लाबक्ष काझी, मुस्तफा बुजरुक उपस्थित होते.