शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आघाडीच्या ‘जयंत नीती’ला भाजपचा खोडा--सांगली, मिरज, कुपवाड महापालिका --निवडणूक विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:31 IST

सत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’

श्रीनिवास नागेसत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील बिघडलेला ताळमेळ, गटबाजी, काँग्रेसकडील एकमुखी नेतृत्त्वाची वानवा, तगडी रसद-प्रचार यंत्रणेचा अभाव हे सगळे पथ्यावर पाडून घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’ केलेल्या भाजपने महापालिकेत आघाडीला चारीमुंड्या चीत केले. जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेनंतर काँग्रेस-राष्टÑवादीचे वर्चस्व असलेले अखेरचे सत्ताकेंद्रही भाजपने हिसकावून घेतले.भाजपने महापालिका निवडणुकीसाठी वर्षभरापासून ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले होते. मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी आणि प्रस्थापितांच्या विरोधातील खदखद भाजपने हेरली होती. त्यातून त्यांनी निवडणुकीआधी जोरदार वातावरण निर्मिती केली. मात्र शेवटच्या महिन्यात त्यात सातत्य ठेवण्यात स्थानिक नेते कमी पडत असल्याचे दिसले. मग हिकमती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील धावून आले. आधी त्यांनी ठाण मांडून, बैठका घेऊन, बुथनिहाय तयारीचा आढावा घेऊन पक्की बांधणी केली होतीच. काँग्रेस-राष्टÑवादीसह इतर पक्षांतून घाऊक आवक करून त्यांना उमेदवारी द्यायचा त्यांचा बेत मिरजेत काहीसा यशस्वी झाला, पण सांगली-कुपवाडमध्ये तडीस गेला नाही. तथापि शेवटच्या टप्प्यात उमेदवारी देताना सर्वेक्षण करून इच्छुकांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ ठरवण्यात चंद्रकांत पाटील यांनी स्वत:ची यंत्रणा वापरली.त्यात त्यांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना काहीसा ‘फ्री हॅन्ड’ दिला. सुभाष देशमुखांना केवळ पालकमंत्री म्हणून सभा-मेळाव्यांतून शाल-श्रीफळापुरता मान दिला, तर खासदार संजयकाका पाटील यांना मात्र काही अंतरावरच ठेवले होते! याचदरम्यान भाजपने कोणत्या ना कोणत्या कारणातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी खुबीने कार्यक्रमांची आखणी केली. अगदी ‘भेटवस्तू’ देण्याची लोणकढी थापही ठोकून दिली!उमेदवारांची यादी जाहीर झाली, तेव्हा काँग्रेस-राष्टÑवादी तुलनेने भाजपपेक्षा बाहुबली वाटत होती. कारण आघाडीत मुरब्बी खेळाडू होते. जयंत पाटील जात्याच हुशार. त्यांनी आघाडीचा तह करताना काँग्रेसच्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला. जेथे भाजप बलवान आहे वा जेथे आपला टिकाव लागणार नाही, तेथे काँग्रेसला उमेदवारी घ्यायला भाग पाडले! ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे’ अशी गत काँग्रेस नेत्यांची झाली.मदन पाटील व पतंगराव कदम यांच्या पश्चात काँग्रेस पहिल्यांदाच सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरी गेली खरी, पण गटबाजी काही संपली नाही. आ. विश्वजित कदम व जयश्रीताई पाटील एकत्र होते, पण विशाल पाटील यांच्याशी त्यांचे जुळले नाही. एकमुखी नेतृत्व व तगडी रसद नसल्याने काँग्रेसच्या चार-पाच जागा हातच्या गेल्या. दुसरीकडे कूटनीतीत मुरब्बी मानल्या जाणाऱ्या जयंत पाटील यांच्या खेळ्या त्यांच्याच अंगलट आल्या.काँग्रेसपेक्षा वरचढ होण्यासाठी त्यांनी ‘गेम’ आखली होती, पण त्यांच्या काही शिलेदारांनी आपापली ‘सीट’ काढत ‘क्रॉस व्होटींग’ करवून घेतल्याने राष्टÑवादीच्या पाच-सहा जागा गेल्या! शिवाय प्रभाग मोठे असल्यानेही ‘क्रॉस व्होटींग’ झाले. परिणामी आघाडीला हमखास मिळणारे चार प्रभाग गमवावे लागले. आघाडीत समन्वय तर बिलकूल नव्हता. त्यातच भाजप प्रचाराचा धुरळा उडवून देत असताना काँग्रेस-राष्टÑवादीचे नेते १५ दिवस सांगलीबाहेर होते! मतदान १ आॅगस्टला, तर आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला २२ जुलैला!‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचविलेसत्ताधाºयांच्या विरोधातील नाराजी स्वत:च्या मतांमध्ये परिवर्तीत करण्यात भाजपची टीम यशस्वी ठरली, तर महापालिका क्षेत्रातील ‘अंडरकरंट’ काँग्रेस-राष्टÑवादीला समजलाच नाही. आघाडीतील बिघडलेला ताळमेळ दिसताच भाजपने मंत्र्यांसह नेत्यांची फौज प्रचारात उतरवली. शेवटच्या आठवड्यात चंद्रकांत पाटील यांनी तर कोणतीच ‘कसर’ सोडली नाही आणि बघताबघता ‘कमळ’ घराघरापर्यंत पोहोचवले. तेच त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण