शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 16:37 IST

Politics Ncp Sangli Bjp : भारतीय जनता पार्टीसह अन्य पक्षात गेलेले आमचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहकारी पुन्हा स्वगृही परतत आहेत. सांगली जिल्हातील भाजपचे जिल्हा परिषद पक्षात येऊ लागले असून पक्षप्रवेशाची आता केवळ सुरूवात झाली आहे. भाजपचे सुमारे दहा ते बारा जिल्हा परिषद सदस्य सध्या आमच्या संपर्कात असल्याने येत्या काही महिन्यात सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला.

ठळक मुद्देभाजपचे जि. प. सदस्य राष्ट्रवादीच्या संपर्कातअविनाश पाटील यांचा दावा

विटा : भारतीय जनता पार्टीसह अन्य पक्षात गेलेले आमचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहकारी पुन्हा स्वगृही परतत आहेत. सांगली जिल्हातील भाजपचे जिल्हा परिषद पक्षात येऊ लागले असून पक्षप्रवेशाची आता केवळ सुरूवात झाली आहे. भाजपचे सुमारे दहा ते बारा जिल्हा परिषद सदस्य सध्या आमच्या संपर्कात असल्याने येत्या काही महिन्यात सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला.विटा येथे युवक राष्ट्रवादी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास आले असताना त्यांनी पक्षप्रवेश देण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादीकॉँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर उपस्थित होते.यावेळी पाटील म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ते व मतदारांचा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर विश्वास आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला आज २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी १७ वर्षे पक्ष सत्तेत आहो. सध्या राष्ट्रवादी समीकरणे बदलत आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसातील राष्ट्रीय घडामोडी पहाता पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना राष्ट्रवादीपातळीवर मोठी संधी मिळणार आहे.

आजपर्यंत अनेकांनी पक्षाच्या मदतीने आमदार, खासदारासह इतर पदे उपभोगली आणि विधानसभा निवडूकीच्या तोंडावर खा. शरद पवार यांची साथ सोडली. परंतु, आता ते आमचे सहकारी पक्षात परत येत आहेत. सांगली जिल्हा परिषदेचे भाजप सदस्य राष्ट्रवादी पक्षात जाहीरपणे प्रवेश करीत आहेत. सध्या एक-दोन सदस्यांनी प्रवेश केला. परंतु, आणखी १० ते १२ सदस्य आमच्या संपर्कात असून तेही भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSangliसांगली