शिराळ्यात भाजपचे ‘आक्रोश आंदोलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:59+5:302021-06-04T04:20:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुका भाजप ओबीसी मोर्चामार्फत राज्य सरकारविरोधात ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. ओबीसी मोर्चाचे जिल्हा ...

BJP's 'Akrosh Andolan' in Shirala | शिराळ्यात भाजपचे ‘आक्रोश आंदोलन’

शिराळ्यात भाजपचे ‘आक्रोश आंदोलन’

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुका भाजप ओबीसी मोर्चामार्फत राज्य सरकारविरोधात ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. ओबीसी मोर्चाचे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष शरद गुरव यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार अरुण कोकाटे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द ही दुर्दैवी घटना आहे. या आरक्षणामुळे आतापर्यंत ओबीसी समाजाला विविध क्षेत्रांतील संस्थांवर निवडणुका लढवून विविध पदांवर स्वाभिमानाने विराजमान होता आले; पण ते आता रद्द केले आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी लढा उभा करू. वेळीच सरकारने योग्य ते नियोजन करावे.

यावेळी वैभव पाटील, अविनाश माळी, गणेश रसाळ, संग्राम लोहार, विनायक लोहार उपस्थित होते.

Web Title: BJP's 'Akrosh Andolan' in Shirala