भाजप कामगार आघाडीची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:06+5:302021-02-05T07:22:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भाजप शहर जिल्हा कामगार आघाडीची कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली. आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रियानंद ...

BJP workers alliance executive announced | भाजप कामगार आघाडीची कार्यकारिणी जाहीर

भाजप कामगार आघाडीची कार्यकारिणी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भाजप शहर जिल्हा कामगार आघाडीची कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली. आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रियानंद कांबळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, प्रदेश भाजप कामगार आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश मोहिते, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नगरसेविका स्वाती शिंदे, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अश्रफ वांकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, भटका विमुक्त जमातीचे युवक अध्यक्ष राजू माने उपस्थित होते.

कार्यकारिणीत सरचिटणीसपदी संजय मोरे, गजानन मोरे, उपाध्यक्ष संभाजी सरगर, दत्तात्रय माने, जय खाडे, अरविंद चव्हाण, चिटणीस गणपती तिडके, राजेंद्र मुरगुंडे, संदीप देशमुख, सदाशिव लाड, सुमित शिंगे, तर सदस्यपदी राहुल महाजन, नारायण जाधव, प्रकाश सरगर, राजेश मद्रासी, अंकुश आवळे, सुदर्शन शिंगे, अशिष शुनगार, सचिन वडर यांची नियुक्ती करण्यात आली.

फोटो ओळी : भाजप शहर जिल्हा कामगार आघाडीच्या नूतन कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीची पत्र देण्यात आली. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे, अविनाथ मोहिते उपस्थित होते.

Web Title: BJP workers alliance executive announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.