मिरजेत काढा वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:19 IST2021-06-06T04:19:48+5:302021-06-06T04:19:48+5:30
मिरज : मिरजेत एक महिना दररोज पोलीस, आशा वर्कर्स, अग्निशमन जवान, पेट्रोल पंप कर्मचारी, रिक्षाचालक व महापालिका कर्मचाऱ्यांना काढायुक्त ...

मिरजेत काढा वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचा सत्कार
मिरज : मिरजेत एक महिना दररोज पोलीस, आशा वर्कर्स, अग्निशमन जवान, पेट्रोल पंप कर्मचारी, रिक्षाचालक व महापालिका कर्मचाऱ्यांना काढायुक्त चहाचे वाटप करणारे भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ओमकार शुक्ल यांचा आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ओमकार शुक्ल यांनी नृत्य शिक्षिका आमिषा करंबेळकर यांच्या सहकार्याने सुमारे साडेपाच हजार कप काढायुक्त चहा बनवून दररोज सकाळी वाटप केला. या उपक्रमात सहभागी राजन काकीर्डे, संतोष कुलकर्णी, मनोज यादव, अनिल तिवारी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक शिंदे-म्हैसाळकर, मकरंद देशपांडे, सभापती पांडुरंग कोरे, डॉ. रेखा खरात, नगरसेवक निरंजन आवटी, जयगोंड कोरे, विजय राठी, सुमेध ठाणेदार, संजय चौगुले, संजय वाटवे, अनघा कुलकर्णी, प्राची पाठक, उमेश हारगे, चंद्रशेखर कुलकर्णी, आबासाहेब कागवाडे उपस्थित होते.