महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला जादा जागा मिळतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:29 IST2021-02-16T04:29:09+5:302021-02-16T04:29:09+5:30
कुपवाडमध्ये शहर भाजपा कार्यालय व प्रकाश ढंग यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला जादा जागा मिळतील
कुपवाडमध्ये शहर भाजपा कार्यालय व प्रकाश ढंग यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दिनकर पाटील, नितीन शिंदे, नीता केळकर, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक प्रकाश ढंग, राजेंद्र कुंभार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, कुपवाड शहरातील ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर इतरही विकासकामे येत्या अडीच वर्षांत पूर्ण होतील. यावेळी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकोपयोगी विकासकामे करावीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकाभिमुख विकास कामामुळे देशात आणि राज्यात जनतेतून भाजपाची लोकप्रियता वाढू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता भाजप प्रवेशाची मालिका सुरू होणार आहे. कोरोनाकाळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकोपयोगी प्रचंड काम केले. यावेळी मुख्यमंत्री घरात बसून होते. देशात मोदींमुळे भाजपची लोकप्रियता वाढू लागली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत आठ कोटी महिलांना गॅस कनेक्शन, दोन कोटी घरांत वीज कनेक्शन, सात कोटी घरांना शौचालये दिली. तीन कोटी बेघर कुटुंबांना घरे देण्याचे काम सुरू आहे. गरिबांना पाच लाखांचा आरोग्यविमा दिला. श्रीराम जन्मभूमी मुक्त केली. ३७० कलम रद्द केल्याने काश्मीर भारतात राहिले. तिहेरी तलाखविरोधी व नागरिक संशोधन कायदा अंमलात आणला.
फोटो
ओळ : कुपवाड येथे नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या कार्यालय उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग, मकरंद देशपांडे, रवींद्र सदामते उपस्थित हाेते.