शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांमध्ये भाजप लढणार स्वबळावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:44 IST

बैठकीस प्रमुख नेते गैरहजर

सांगली : जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात भाजपला अनुकूल वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप स्वबळावरच निवडणुका लढणार आहे. यामध्ये काही मित्र पक्ष आणि त्यांचे नेते, पदाधिकारी सहभागी झाले तर त्यांनाही बरोबर घेणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बुधवारी दिली.बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत बैठक झाली. या बैठकीनंतर मंत्री खाडे बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह इच्छुक उमेदवार व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री खाडे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजपच्या मतदारांची संख्या वाढली आहे. सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी सातही बाजार समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका माझ्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार बुधवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीस काही नेते गैरहजर होते, पण, त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. सर्वच भाजप नेत्यांनी बाजार समित्यांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली आहे. त्यानुसार बाजार समित्यांच्या निवडणुका भाजप मित्र पक्ष व संघटनांच्या सहकार्याने लढणार आहे.प्रमुख नेते गैरहजर, पुन्हा शनिवारी बैठकबाजार समित्यांच्या निवडणुकाबाबत बोलविलेल्या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, माजी आ. विलासराव जगताप, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, सत्यजित देशमुख आदी प्रमुख नेते गैरहजर होते. त्यामुळे पुन्हा शनिवार, दि. १५ रोजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे, अशी माहिती मंत्री खाडे यांनी दिली.शिंदे गटालाही संधी

  • भाजपबरोबर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गट सहभागी आहे. जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्येही शिंदे गटाला संधी देण्यात येणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
  • अन्य मित्र पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनही बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनाही बरोबर घेण्यात येणार आहे, असेही मंत्री खाडे म्हणाले.
टॅग्स :SangliसांगलीMarketबाजारElectionनिवडणूकBJPभाजपा