भाजप शिक्षक आघाडीचे विविध मागण्यांसाठी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:02+5:302021-09-11T04:27:02+5:30
ओळी : जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केदारी रसाळ, महेश पाठक, उत्तमराव ...

भाजप शिक्षक आघाडीचे विविध मागण्यांसाठी धरणे
ओळी : जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केदारी रसाळ, महेश पाठक, उत्तमराव पाटील, हेमंत जोशी, नवनाथ लाड, दि.रा. पवार, संदीप पोरे, वर्षा कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या तारखा जाहीर कराव्यात, अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते सुरू करावे, वेतनास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम तात्काळ द्यावी, शिक्षण सेवकांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावे, शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी, रात्र शाळेतील कर्मचाऱ्यांना पूर्णकालीन कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळावा, आदींसह विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे संयोजक केदारी रसाळ, सहसंयोजक महेश पाठक, उत्तमराव पाटील, हेमंत जोशी, नवनाथ लाड, दि.रा. पवार, संदीप पोरे, वर्षा कुलकर्णी, वर्षा जहागीरदार, संतोष देशपांडे, प्राची गोडबोले, विश्वास गुरव, प्रिया कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.