म्हैसाळला सरपंच निवडीवेळी भाजपमध्ये फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:05+5:302021-02-10T04:26:05+5:30

म्हैसाळ ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्याविरोधात भाजपचे सांगली शहर ...

BJP split during Mahisal sarpanch election | म्हैसाळला सरपंच निवडीवेळी भाजपमध्ये फूट

म्हैसाळला सरपंच निवडीवेळी भाजपमध्ये फूट

म्हैसाळ ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्याविरोधात भाजपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, पुष्पराज केदारराव शिंदे-म्हैसाळकर, दिलीप पाटील यांनी पॅनेल उभे केले होते. भाजपचे १७ पैकी १५, तर मनोज शिंदे-म्हैसाळकर गटाचे दोन सदस्य विजयी झाले होते. सरपंचपद खुले झाल्याने भाजपमध्ये सरपंच पदासाठी एकमत होऊ शकले नाही.

सरपंच पदासाठी रश्मी आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात पुष्पराज केदारराव शिंदे-म्हैसाळकर यांनीही अर्ज दाखल केला. गुप्त पध्दतीने मतदानाची प्रक्रिया पार पडली. १५ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मनोज शिंदे-म्हैसाळकर गटाचे दोन सदस्य गैरहजर राहिले. रश्मी शिंदे-म्हैसाळकर यांना नऊ, तर पुष्पराज शिंदे-म्हैसाळकर यांना सहा मते मिळाली.

नूतन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल रश्मी शिंदे यांचा, तर उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल पद्मश्री पाटील यांचा सत्कार गणेश भांबुरे यांच्याहस्ते करण्यात आला.

Web Title: BJP split during Mahisal sarpanch election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.