शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भाजपने पाकिस्तानी मंत्र्याच्या प्रतिमेस मारले जोडे, पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेचा निषेध

By अविनाश कोळी | Updated: December 17, 2022 14:35 IST

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांच्या प्रतिमेस आज, शनिवारी भाजपच्यावतीने जोडे ...

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांच्या प्रतिमेस आज, शनिवारी भाजपच्यावतीने जोडे मारण्यात आले. सांगलीतील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भुट्टो यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. भुट्टो यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याचा निषेध भाजपच्यावतीने करण्यात आला. भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी यांनी देशात अत्यंत चांगले काम करून जगभरात देशाची चांगली प्रतिमा बनविली आहे. याचा राग आर्थिकदृष्ट्या खाईत गेलेल्या पाकिस्तानला येतो. द्वेषबुद्धीने ते वागतात. त्यामुळेच अमेरिकेत जाऊन त्यांनी हा द्वेष बाहेर काढला. बिनबुडाचे आरोप त्यांनी केले. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत.आंदोलनात भाजपच्या नेत्या नीता केळकर, माजी आमदार नितीन शिंदे, प्रदेश संघटक पृथ्वीराज पवार, शेखर इनामदार, दीपक शिंदे, श्रीकांत शिंदे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा ॲड. स्वाती शिंदे, महापालिकेच्या सभागृह नेत्या भारती दिगडे, संगीता खोत, अनारकली कुरणे, अविनाश मोहिते, सुब्राव मद्रासी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाPakistanपाकिस्तानagitationआंदोलन