केंद्र सरकारच्या निर्णयावर भाजप गप्प का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST2021-05-19T04:27:12+5:302021-05-19T04:27:12+5:30
सांगली : कोरोनामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर टाकल्यावर राज्यभर आंदोलन पेटविणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर ...

केंद्र सरकारच्या निर्णयावर भाजप गप्प का?
सांगली : कोरोनामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर टाकल्यावर राज्यभर आंदोलन पेटविणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर टाकल्यावर मौन का बाळगले, असा सवाल युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दुधाळ यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहेत? की, कोरोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता, परंतु त्या वेळी या परीक्षा पुढे ढकलून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची टीका करीत भाजपने राज्यभर आंदोलन केले. सरकारविरोधात रस्त्यावर पडून आ. गोपीचंद पडळकरांनी ऊर बडवून घेत स्टंटबाजी केली. आता केंद्र सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर बहुजन समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याच्या नावाखाली भाजप नेते काय करणार आहेत?
केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर ऊर बडवून घेत आंदोलन करणार का? ते जमत नसेल तर स्वतःच्या राजकीय प्रतिष्ठेला हपापलेल्या आमदार पडळकरांनी बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये. भाजपचे अन्य नेतेही आता मूग गिळून गप्प आहेत. भाजप नेत्यांनी केलेले राजकारण आता विद्यार्थ्यांना व जनतेला समजले आहे. या ढोंगी भाजप नेत्यांचा आम्ही निषेध करीत आहोत, असे दुधाळ म्हणाले.