शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजप, शिवसेनेकडून ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:31 IST

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप, शिवसेनेचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अपक्ष आणि मित्र पक्षातील निवडून आलेल्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. विदर्भातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार निवडून आले आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजप, शिवसेनेकडून ऑफर शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे खात्रीशीर वृत्त

अशोक पाटील इस्लामपूर : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप, शिवसेनेचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अपक्ष आणि मित्र पक्षातील निवडून आलेल्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. विदर्भातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार निवडून आले आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात भाजप-शिवसेना बॅकफुटवर गेली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ मोडीत निघणार, असेच चित्र निर्माण झाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांनी अमरावती जिल्ह्यातील वरुडमोरशी मतदार संघातून विद्यमान मंत्री अनिल भांडे यांचा पराभव केला. त्यामुळे राज्यातील संघटनेला ऊर्जा मिळाली आहे.दरम्यान, राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने युध्दपातळीवर प्रयत्न चालवले आहेत. परंतु त्याला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नाही. मुख्यमंत्रिपदासह ५० टक्क्यावर शिवसेना ठाम असल्याने दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी वेगळ्या वाटा चोखाळण्यास सुरुवात केली आहे.

सत्ता स्पर्धेत अपक्ष व मित्र पक्षांच्या आमदारांचा भाव वधारला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी माजी खा. शेट्टी यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSangliसांगलीPoliticsराजकारण