शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत सुरेश खाडे यांची भाजप बंडखोराशी लढत?, मोहन वनखंडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:02 IST

आठवड्याभरात काँग्रेस प्रवेश

सदानंद औंधेमिरज : मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर मोहन वनखंडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित झाल्याची सुत्राची माहिती आहे. येत्या आठवड्यात वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे इच्छुक अस्वस्थ झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या विरोधात भाजप अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी आघाडी उभारली आहे. खाडे यांच्या प्रत्येक निवडणुकीचे नियोजन करणारे वनखंडे यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. वनखंडे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याने मिरज भाजपमध्ये दुफळी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप मिरजेत २५ हजाराने पिछाडीवर आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरजेत बंडखोर गटाने विरोधकांशी संधान साधल्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक आहे.

पालकमंत्र्यांचे विरोधक व जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासोबत वनखंडे यांची जवळीक आहे. जनसुराज्य शक्तीकडून वनखंडे यांच्यासाठी मिरज मतदारसंघाची मागणी केली आहे. शिवाय वनखंडे हे महाविकास आघाडीचे नेते खासदार विशाल पाटील व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पालकमंत्र्यांशी लढत देण्यासाठी वनखंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी आहे. त्यामुळे आठवड्याभरात मोहन वनखंडे काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.चार दिवसांपूर्वी काॅंग्रेसतर्फे विशाल पाटील समर्थकांनी पत्रकार परिषदेत भाजप बंडखोर आयात उमेदवार आम्हाला चालेल, असे जाहीर केले आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून पक्षातील नव्हे, तर आयात उमेदवार निवडणूक लढविणार चर्चा आहे.

मिरजेबाबत व्हिजन स्पष्ट कराभाजप व काॅंग्रेसचे संभाव्य उमेदवार असलेल्या पालकमंत्री सुरेश खाडे व मोहन वनखंडे या दोघांनी पुढील पाच वर्षांत मिरजेसाठी काय ’व्हिजन’ असणार आहे. हे किसान चौकात मिरज सुधार समितीच्या व्यासपीठावर येऊन स्पष्ट करावे, असे आवाहन मिरज सुधार समितीने केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी