आमदारांच्या निलंबनप्रकरणी भाजपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:39+5:302021-07-07T04:33:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्य शासनाने भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ सांगलीत भाजप युवा मोर्चाच्यावतीने ‘जोडेमार’ आंदोलन ...

आमदारांच्या निलंबनप्रकरणी भाजपची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्य शासनाने भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ सांगलीत भाजप युवा मोर्चाच्यावतीने ‘जोडेमार’ आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जोडे दाखवून शासनाच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. यावेळी
माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा दडपण्यासाठीच महाविकास आघाडीच्या सरकारने भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे. ही कारवाई तालिबानी पद्धतीची आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सरकार करीत आहे.
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ॲड. सौ. स्वाती शिंदे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. तसेच हे सरकार भ्रष्ट व नाकर्ते आहे. ओबीसी, मराठा आरक्षण रद्द ठरविण्यात हे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे.
आंदोलनात स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, अमर पडळकर, किरण भोसले, नगरसेविका भारती दिगडे, वैशाली पाटील, स्मिता पवार, रेखा पवार, नगरसेविका ऊर्मिला बेलवलकर, गीतांजली धोपे-पाटील, कल्पना कोळेकर, संजय कुलकर्णी, संजय यमगर, रघू सरगर, ज्योती कांबळे, वैशाली शेळके, राहुल माने, राहुल मदने, अमित गडदे आदी सहभागी झाले होते.