शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांविरोधात पडळकर-खोत आक्रमक, अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या लोकार्पणास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 17:31 IST

'सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको.'

सांगली: सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. त्याला पडळकर आणि खोत यांनी विरोध दर्शवला असून, दोन्ही नेते रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन करत आहेत. दरम्यान, पुतळ्याचे लोकार्पण झाल्याचा दावाही पडळकरांनी केला आहे.

आज सांगलीत पिवळे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी शहरात पिवळे वादळ आणले आहे. शरद पवरांनी गोरगरिबांची फसवणूक केली, त्यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होऊ नये, अशी आक्रमक भूमिका पडळकरांनी घेतली आहे. तर, सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको. आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली, कंटाळा आला नाही का? असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी पवारांना केला आहे. 

लोकार्पण झाल्याचा पडळकरांचा दावादरम्यान, या सर्व गोंधळात पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करणे शक्य नव्हते, त्यामुळे पडळकरांनी पुन्हा एकदा आपला गनिमीकावा दाखवला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.

काय म्हणाले पडळकर?लोकाप्रणापूर्वी मीडियाशी संवाद साधताना पडळकर म्हणाले होते की, पुतळ्याचे लोकार्पण आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. हा लोकार्पण सोहळा आमच्या मेंढपाळांच्या हस्ते पार पडणार. मात्र अशा मेंढपाळांना सरकार विरोध करून पद मोठी मनं छोटी याचे दर्शन घडवत आहेत, असा हल्लाबोल गोपीचंद पडकर यांनी केला. तसेच, आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, पोलिसांनी अडवूनही एवढे लोक याठिकाणी पोहोचले, हे उद्घाटन महाराष्ट्र बघेल असे थेट आव्हानही गोपीचंद पडळकर यांनी दिले होते.  

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगली