शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

Maharashtra Vidhan Sabha 2019: बंडखोरांना थोपविण्याचे भाजप नेतृत्वासमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:22 IST

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेमध्ये कमळ फुलल्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परिणामी जत, शिराळा, इस्लामपूर, सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. बंडोबांना थांबविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे. मिरजेत भाजपच्या बंडखोरालाच काँग्रेस आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिली.

ठळक मुद्देबंडखोरांना थोपविण्याचे भाजप नेतृत्वासमोर आव्हाननेत्यांनी छुप्या मार्गाने बंडाचा झेंडा घेतल्याची चर्चा

अशोक डोंबाळे सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेमध्ये कमळ फुलल्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परिणामी जत, शिराळा, इस्लामपूर, सांगलीविधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. बंडोबांना थांबविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे. मिरजेत भाजपच्या बंडखोरालाच काँग्रेस आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिली.जिल्ह्यातील चार विधानसभा भाजपला, तर चार शिवसेनेला मिळाल्या आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असताना, तेथील जागा शिवसेनेला गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना धक्का बसला आहे. देशमुख यांच्यावर कार्यकर्त्यांचा बंडखोरीसाठी दबाव होता. पण, अखेरच्याक्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समजूत काढल्यामुळे त्यांनी अर्ज भरला नाही.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सत्यजित देशमुख यांना शिराळा विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण भाजपने पहिल्याच यादीत शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी जाहीर करून देशमुख गटाला धक्का दिला. पण त्यांची समजूत काढण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले. मात्र तिसरे इच्छुक महाडिक युवाशक्तीचे सम्राट महाडिक यांनी मात्र शिराळ्यातून बंडखोरी केली आहे. महाडिक भाजपमध्ये नसले तरी ते पक्षाच्या निकट असून, त्यांच्या उमेदवारीचा फटका बसणार असल्याने भाजपचे नेते त्यांना थांबवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.सांगलीत भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात भाजपचे कवलापूर जिल्हा परिषद गटातील शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या पत्नी विद्या डोंगरे या बुधगाव (ता. मिरज) जिल्हा परिषद गटात भाजपच्या सदस्या आहेत. ग्रामीण भागात डोंगरे गटाचे वर्चस्व असल्यामुळे त्यांची बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. डोंगरे यांचे बंड थोपविण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.इस्लामपुरात भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनीही शिवसेना उमेदवार गौरव नायकवडी यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भोसले-पाटील गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष चालू आहे. उमेदवारीच्या माध्यमातून हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलविरोधी गटाची रयत विकास आघाडी यानिमित्ताने फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

खोत यांचे गौरव नायकवडी यांना पाठबळ असल्यामुळे शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात ते यशस्वी झाले.जतमध्ये विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात गेल्या वर्षभरापासून एक गट कार्यरत होता.

डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी, भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण अखेरच्या टप्प्यात जगताप उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्यामुळे डॉ. आरळी यांनी बंडखोरी करुन अर्ज दाखल केला आहे. जगतापविरोधकांना एकत्रित करुन तगडे आव्हान देण्याची त्यांची तयारी सुरु आहे. भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची मनधरणीच्या प्रयत्नात आहेत.मिरज विधानसभा मतदारसंघातून सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याविरोधात त्यांचे समर्थक महापालिका नगरसेवक आनंदा देवमाने यांच्या पत्नी शुभांगी देवमाने यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीमध्ये मिरजेची जागा स्वाभिमानीला गेली आहे. स्वाभिमानीने शुभांगी देवमाने यांना उमेदवारी दिली आहे.खानापूर मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीची उमेदवारी आमदार अनिल बाबर यांना मिळाली आहे. बाबर यांच्याविरोधात आटपाडीतील भाजपचे नेते अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडळकर गटाने छुप्या मार्गाने बंडाचा झेंडा घेतल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगली