शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते खालच्या पातळीवरचं राजकारण करतात- पृथ्वीराज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 21:12 IST

सांगली : जयंत पाटील यांच्या आर्इंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या काही तासांतच जयंतरावांवर टीका केली.

सांगली : जयंत पाटील यांच्या आर्इंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या काही तासांतच जयंतरावांवर टीका केली. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण भाजपा नेत्यांनी सुरू केले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीतील एका कार्यक्रमात महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा समाचार पृथ्वीराज पाटील यांनी घेतला. ते म्हणाले की, ज्यांना जनतेमधून निवडून येता आले नाही, त्यांनी जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करू नये. जयंत पाटील यांच्या घरी सांत्वनाला जाऊन आल्यानंतर किमान त्यांच्याबद्दल तरी काही न बोलण्याचे पथ्य त्यांनी पाळायला हवे होते, मात्र त्यांना जयंतरावांच्या घरच्या सुतकाचेही भान राहिले नाही. अशाप्रकारचे राजकारण वरिष्ठ पदाचे मंत्री म्हणून त्यांना शोभत नाही.पदवीधर मतदारसंघात ते अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊनच निवडून आले हे जगजाहीर आहे. उलट डॉ. कदम व जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी ३0 ते ३५ वर्षे आमदार, मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांना मतदारसंघ बघा म्हणण्याइतपत तुम्ही मोठे झाला नाहीत. कोल्हापुरात तुमच्या होम पिचवरच महापालिका, विधान परिषद निवडणुकीत तुम्हाला काँग्रेसने धूळ चारली हे विसरला का? सर्वपक्षीय आघाडी करूनही तुम्ही तोंडघशी पडलात. सांगलीचे पाणी तुम्हाला पचणार नाही.पाटील म्हणाले, गुजरात निवडणुकीच्या निकालाने भाजपची अवस्था ह्यबाल बाल बचेह्ण अशी आहे. त्यामुळे मोदी लाट आता संपली आहे. तुमचे इनकमिंग बंदच झाले आहे. आताही महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतून नाराज उमेदवारीवर तुम्ही सत्तेची स्वप्ने पाहात आहात, असे ते म्हणाले.उसन्या उमेदवारांवर उसने अवसानमहापालिका निवडणूक त्यांनी मूळ भाजपवासियांना तिकिट देऊन लढवून दाखवावी. त्यांना उमेदवारही मिळणार नाहीत. केवळ उसन्या उमेदवारांवर विजयाचे उसने अवसान चंद्रकांतदादा आणत आहेत. त्यांची ताकद केवळ आयात उमेदवारांचीच आहे. मूळ कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी पक्षीय ताकद सिद्ध करून दाखवावी, असे आव्हान पाटील यांनी दिले. आतापर्यंत विकासकामांना त्यांनीकधीच वेळ दिला नाही. निवडणुकीसाठी कामे अडवून शहराला वेठीस धरत आहेत, अशी टीका पृथ्वीराज पाटील यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगली