बेडगमध्ये भाजपतर्फे वीज बिल माफीसाठी टाळे ठोक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:15+5:302021-02-06T04:49:15+5:30

अनेक संघटना व राजकीय पक्षांनी वीज बिल माफीची मागणी करूनही राज्य शासनाने वीज बिले माफ केली नाही. उलट ...

BJP launches agitation in Bedag for power bill waiver | बेडगमध्ये भाजपतर्फे वीज बिल माफीसाठी टाळे ठोक आंदोलन

बेडगमध्ये भाजपतर्फे वीज बिल माफीसाठी टाळे ठोक आंदोलन

अनेक संघटना व राजकीय पक्षांनी वीज बिल माफीची मागणी करूनही राज्य शासनाने वीज बिले माफ केली नाही. उलट वीज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला. महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या विरोधात बेडग येथे भाजपचे आमदार सुरेश खाडे, उमेश पाटील यांच्या वतीने टाळे ठोको आंदोलन करून बेडग महावितरण उपकेंद्रातील अधिकारी जेरीमलली यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात आमदार सुरेश खाडे, मोहन व्हनखडे, भाजप नेते उमेश पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मुंडगनूर, सरिता कोरबू, उमेश हारगे, शंकर शिंदे, आप्पा पाटील, बाबासाहेब आळतेकर, नंदू शिंदे, भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

फोटो : ०५ मिरज १

ओळ : बेडग (ता. मिरज) येथे वीज बिल माफीच्या मागणीसाठी भाजपचे आमदार सुरेश खाडे, उमेश पाटील, नंदू शिंदे व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

Web Title: BJP launches agitation in Bedag for power bill waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.