शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या सभापती निवडीवर भाजपचे वर्चस्व, फुटीर नगरसेवकांची घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 12:28 IST

भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी घरवापसी केल्याने सभापती निवडीत भाजपचा मार्ग सुकर झाला.

सांगली : महापालिकेच्या समाज कल्याण व महिला बालकल्याण समिती सभापतीपदी अनुक्रमे भाजपच्या अनिता वनखंडे व अस्मिता सलगर यांची निवड झाली. काँग्रेसच्या कांचन कांबळे यांनी माघार घेतल्याने वनखंडे यांची बिनविरोध निवड झाली. तर सलगर यांनी आघाडीच्या आरती वळवडे यांचा ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी घरवापसी केल्याने सभापती निवडीत भाजपचा मार्ग सुकर झाला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. महिला व बालकल्याण समितीमध्ये भाजप ९, काँग्रेस ४, तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. सभापती पदासाठी भाजपच्या अस्मिता सलगर व आघाडीच्या आरती वळवडे यांच्यामध्ये लढत झाली. फुटीर नगरसेविका नसीमा नाईक या भाजपच्या गोटात सहभागी झाल्या. सलगर यांना ९, तर वळवडे यांना ७ मते मिळाली.समाज कल्याण समितीमध्ये भाजप ७, राष्ट्रवादी ३, तर काँग्रेसच्या १ सदस्यांचा समावेश आहे. सभापती पदासाठी भाजपकडून अनिता वनखंडे व आघाडीच्या कांचन कांबळे यांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याने कांबळे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला. त्यामुळे वनखंडे बिनविरोध निवडून आल्या. त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी केली.निवडीनंतर आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, शेखर इनामदार, गटनेत्या भारती दिगडे, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी नूतन सभापतींचा सत्कार केला.शहराच्या विकासावर भर : इनामदारशेखर इनामदार म्हणाले, दोन्ही सभापती कामातून पदांना न्याय देतील. भाजप एकसंघ असल्याने विजयाने सिद्ध झाले. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणार आहोत. मिरज येथील काळीखण सुशोभीकरण, कुपवाड ड्रेनेज, ५० कोटींचा निधी, सुसज्ज नाट्यगृहासह विविध विकासकामांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या आठ महिन्यांत महापालिकेच्या विकासाचा बॅकलाॅग भरून काढू, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपा