गाेपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची भाजपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:27+5:302021-07-04T04:18:27+5:30
सोलापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा भाजपतर्फे निषेध करण्यात आला. हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे. ...

गाेपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची भाजपची मागणी
सोलापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा भाजपतर्फे निषेध करण्यात आला. हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून हा प्रकार घडला आहे. ज्या तरुणाने दगडफेक केली त्यास तातडीने अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यांत आली. बहुजन समाजाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार पडळकर यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असल्याने त्यांना त्वरित सुरक्षा देण्याची मागणी करण्यांत आली.
यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव जयगोंड कोरे, नगरसेवक निरंजन आवटी, भाजप शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, राजेंद्र नातू, ज्योती कांबळे, रूपाली देसाई, अमोल सूर्यवंशी, ईश्वर जनवडे, शिवरुद्ध कुंभार, संजय कोटकर, महेश फोंडे, आदिनाथ शेडबाळे, सुप्रिया जोशी, भास्कर कुलकर्णी, आकाश सुतार, हबीब शेख, अनघा कुलकर्णी उपस्थित होते.