शिराळा, सुरुल येथे भाजपला खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST2021-08-15T04:28:05+5:302021-08-15T04:28:05+5:30

शिराळा : भाजपला शिराळा व वाळवा तालुक्यांत खिंडार पडले असून, शिराळा येथील सत्यजित देशमुख यांचे खंदे समर्थक व ...

BJP cracks in Shirala, Surul | शिराळा, सुरुल येथे भाजपला खिंडार

शिराळा, सुरुल येथे भाजपला खिंडार

शिराळा : भाजपला शिराळा व वाळवा तालुक्यांत खिंडार पडले असून, शिराळा येथील सत्यजित देशमुख यांचे खंदे समर्थक व माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील व आमदार मानसिगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कदम यांच्यासह अर्चना कदम, अरविंद खबाले, प्रशांत पाटील, जगदीश पाटील, ॲड. अक्षय कदम, अमर पाटील, जयवंत देसाई, आदींनीही पक्षप्रवेश केला. सुरुल (ता. वाळवा) येथील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या समर्थक लोकनियुक्त सरपंच कुंदाताई पाटील यांनीही शिवाजी पाटील, भानुदास कांबळे, स्वप्निला मदने हे ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटीचे अध्यक्ष पोपट पाटील यांच्यासह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या सर्वांचा सत्कार मंत्री पाटील व आमदार नाईक यांच्याहस्ते करण्यात आला.

चौकट

माझे वडील दिवंगत पांडुरंग कदम यांच्यापासून आमचे कुटुंब माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील तसेच विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विचाराने राजकीय वाटचाल आहे. देशमुख शेवटपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. मात्र सत्यजित देशमुख भाजपमध्ये गेले आहेत. भाजपच्या विचाराने आमची घुसमट होत असल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

- महादेव कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य

140821\img-20210814-wa0072.jpg

फोटो- शिराळा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केल्या बद्दल सत्कार करताना पालकमंत्री जयंतराव पाटील , आमदार मानसिंगराव नाईक.

Web Title: BJP cracks in Shirala, Surul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.