शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

BJP-Eknath Shinde: भाजप-एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी, सांगलीत संघर्षाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 16:48 IST

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या दाव्यामुळे संघर्ष पेटला

सांगली : भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना राज्यातील सत्तास्थानी गुण्यागोविंदाने नांदताना दिसत असली तरी जिल्ह्यात या दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या नेत्यांकडून शिंदे यांच्या पक्षाला अदखलपात्र ठरविले जात असून आता विधानसभेच्या सर्व आठही जागांवर भाजपकडून दावा केल्याने शिंदे गटाचे आमदार व पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.सांगली जिल्ह्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे खानापूर-आटपाडी ही विधानसभेची एकमेव जागा आहे. याठिकाणी आमदार अनिल बाबर यांचे वर्चस्व असले तरी याच मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी दावा केल्यामुळे संघर्ष पेटला आहे. पुढील आमदारकीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दावेदारी केली जात आहे.शिंदे यांच्या शिवसेनेमार्फत इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव या मतदारसंघातील विधानसभा लढविण्याचीही तयारी केली जात आहे. युतीतील जागावाटपात यासाठी दावा केला जाऊ शकतो. अशा स्थितीत एकाही मतदारसंघासाठी भाजप तडजोड करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.भाजपचे नेते त्याबाबत आता जाहीर कार्यक्रमातून दावे करू लागले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही. आमदार अनिल बाबर यांनी मात्र त्यांच्या मतदारसंघातील दावेदारी कायम असल्याचे सांगत पडळकरांना टोला लगावला आहे. एकुणच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पर्श्वभुमीवर राजकीय वातावरण सध्या तापु लागले आहे.महापालिका क्षेत्रातील लोकांवर  दोन्ही पक्षांतील नेत्यांचा डोळाराष्ट्रवादी, काँग्रेसमधील नगरसेवक तसेच या दोन्ही पक्षांचे महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी खेचण्यासाठी भाजप व शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून एकाचवेळी ऑफर मिळत असल्यामुळे प्रवेश करणारेही गोंधळले आहेत.आठही जागा आमच्याचपालकमंत्री व भाजपचे नेते आ. सुरेश खाडे यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील आठही मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून येतील, असा दावा केला. आठही जागांवर निवडणूक लढविण्याचे त्यांनी जाहीरही केले. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.विकासकामांमध्येही संघर्षएकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विविध कामांना हिरवा कंदील दर्शविला आहे. याच कामांचे श्रेय भाजपचे नेतेही घेताना दिसत आहेत. खानापूर आटपाडी मतदारसंघात हा संघर्ष अधिक दिसून येत आहे. 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना