भाजपच्यावतीने भ्रष्टाचार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:54+5:302020-12-13T04:39:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्यावतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केल्यामुळे भाजपने ...

BJP celebrates Corruption Day | भाजपच्यावतीने भ्रष्टाचार दिन साजरा

भाजपच्यावतीने भ्रष्टाचार दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्यावतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केल्यामुळे भाजपने त्याला प्रतिउत्तर म्हणून शनिवारी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन साजरा केला.

भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या शाळा, रिसाला रोडसमोर राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना माने म्हणाले की, यापुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.

यावेळी ओबीसी युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल माने, अमित भोसले, प्रथमेश वैद्य, राजू जाधव, राजू मद्रासी, सोहम जोशी, सागर ईरकर, राहुल दुधाळ, अनिकेत खिलारे, शुभम कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: BJP celebrates Corruption Day