भाजप उद्योग आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:23+5:302021-09-02T04:56:23+5:30
सांगली : भाजपच्या शहर जिल्हा उद्योग आघाडीच्या नव्या कार्यकारिणीची निवड मंगळवारी करण्यात आली. नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात ...

भाजप उद्योग आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर
सांगली : भाजपच्या शहर जिल्हा उद्योग आघाडीच्या नव्या कार्यकारिणीची निवड मंगळवारी करण्यात आली. नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
आघाडीची सांगली येथे बैठक पार पडली. उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्माॅल ॲण्ड मीडियम एन्टरप्रायझेसचे दिल्लीचे संचालक प्रदीप पेशकार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत सांगली शहर जिल्हा उद्योग आघाडीची कार्यकारिणी निवड आमदार सुधीरदादा गाडगीळ, शहर अध्यक्ष दीपक शिंदे, संजय आरणके, जिल्हाध्यक्ष शरद नलवडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
सरचिटणीसपदी रवींद्र बाबर, अर्चना पवार, संतोष भावे, तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन बालनाईक, शशिकांत टेके, सचिन कोरे, विनायक शिंदे, प्रजीत नेगांधी, रवि छेडा आनंदा चिकोडे यांची निवड करण्यात आली. यावेळी दीपक माने, धीरज सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, प्रकाश बिरजे, महापालिकेचे सभागृह नेते विनायक सिंहासने, चेतन माडगुळकर आदी उपस्थित होते. स्वागत जिल्हा अध्यक्ष शरद नलवडे व आभार सरचिटणीस रवींद्र बाबर यांनी मानले.