बिसूर रस्त्याचे काम महिन्याभरात सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:30 IST2021-03-01T04:30:21+5:302021-03-01T04:30:21+5:30

सांगली : कर्नाळमधील रिंगरोडचे काम लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत ...

Bisur road work will start within a month | बिसूर रस्त्याचे काम महिन्याभरात सुरू करणार

बिसूर रस्त्याचे काम महिन्याभरात सुरू करणार

सांगली : कर्नाळमधील रिंगरोडचे काम लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत दिली. कर्नाळ ते बिसूर या रस्त्याच्या कामाला येत्या महिनाभरात सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले.

कर्नाळ ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. त्यानिमित्ताने पाटील यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच युवराज पाटील यांच्यासह सर्व सदस्यांचा त्यांनी सत्कार केला. यावेळी पृथ्वीराज पाटील यांचा ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पाटील यांनी गावच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कर्नाळ गावचा रिंगरोड व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावाभोवती मोठी वाहतूक असल्यामुळे रिंग रोड आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. या कामाविषयी पृथ्वीराज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि रिंगरोडचे सर्वेक्षण करून घेण्यास सांगितले.

कर्नाळ ते बिसूर रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जाऊन आपण मंजुरी आणलेली आहे. या कामाची सुरुवात येत्या महिनाभरात अपेक्षित आहे. दलित वस्ती सुधारसह ग्रामसचिवालय, जनावरांचा दवाखाना आणि क्रीडांगण या कामासाठीही मदत मिळवून देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

Web Title: Bisur road work will start within a month