शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस जयंतरावांचा, चर्चा कृष्णाच्या निवडणुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:30 IST

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून कृष्णाच्या आजी-माजी तिन्ही अध्यक्षांनी जयंतरावांना शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्देवाढदिवस जयंतरावांचा, चर्चा कृष्णाच्या निवडणुकीचीआजी-माजी तिन्ही अध्यक्षांनी दिल्या जयंतरावांना शुभेच्छा

निवास पवारशिरटे : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून कृष्णाच्या आजी-माजी तिन्ही अध्यक्षांनी जयंतरावांना शुभेच्छा दिल्या.या वाढदिवसाला तिन्ही अध्यक्षांची उपस्थिती राहिल्याने,कृष्णाच्या परिसरात चर्चेला उधाण आले आहे. वाढदिवस जयंतरावांचा, चर्चा मात्र कृष्णाच्या निवडणुकीचीच जोरदार सुरु असल्याने, येणाऱ्या निवडणुकीत जयंतरावांची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड ) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मे-जून च्या दरम्यान होत आहे. निवडणुकीला अवधी असला तरी, कृष्णाच्या परिसरात मात्र आतापासूनच आरोपांच्या फैरी उडू लागल्या आहेत.विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते व रयत संघर्ष मंचचे डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कृष्णाच्या कार्यक्षेत्रात संपर्क दौरे सुरु केले आहेत. नुकत्याच झालेल्या जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर आपापल्या सोयीनुसार तिन्ही आजी-माजी अध्यक्षांनी मंत्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या.कृष्णाचे जवळपास ४९ हजार सभासद असून कऱ्हाड, खानापूर, कडेगाव तालुक्यासह वाळवा तालुक्यातील ४२ गावांचा समावेश कृष्णाच्या कार्यक्षेत्रात होतो. अपवाद वगळता सर्वच गावांवर मंत्री जयंत पाटील यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे भोसले-मोहिते या तिन्ही गटांना, जयंत पाटील यांची निवडणुकीत साथ मिळावी, हीच अपेक्षा राहणार हे साहजिकच .कृष्णाच्या निवडणुकांचा मागोवा घेतला, तर मंत्री पाटील यांनी आजपर्यंत कधीच उघड भूमिका घेतलेली नाही. कृष्णाच्या राजकारणातील तिन्ही गटात त्यांचेच कार्यकर्ते विखुरलेले आहेत. त्यामुळे मंत्री पाटील यांची भूमिका ही तटस्थच राहिली आहे.

विद्यमान डॉ. सुरेश भोसले गट भाजप, अविनाश मोहिते राष्ट्रवादी व डॉ. इंद्रजित मोहिते कट्टर काँग्रेसप्रेमी आहेत. त्यामुळे येणारी निवडणूक पक्षीय पातळीवर होणार, की स्थानिक गटा-तटावर, यावर बरेच काही अवलंबून आहे.

कृष्णाच्या निवडणुकीत तिन्ही गटातील कार्यकर्त्यांना आपलेसे वाटणारे मंत्री जयंत पाटील यांचा कल मात्र कोणत्या गटाकडे असतो, हे एक न उलगडणारे कोडेच आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृष्णाच्या निवडणुकीच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलElectionनिवडणूकSugar factoryसाखर कारखानेSangliसांगली