शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचे लाडू वापरुन पक्ष्यांची शिकार, सांगलीतील आरगमध्ये समोर आला प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:12 IST

शेतकऱ्याच्या सतर्कतेने पक्षी बचावले

बेडग : युरियाचे प्राणघातक लाडू वापरुन चित्तर पक्ष्यांच्या शिकारीचा प्रयत्न आरग (ता. मिरज) येथे झाला. एका शेतकऱ्याच्या सतर्कतेने पक्ष्यांचे प्राण वाचले.शिपूर रस्त्यावरील एका शेताजवळ काही शिकाऱ्यांनी युरियाचे लाडू ठिकठिकाणी टाकले होते. त्यामध्ये काही धान्याचे दाणे मिसळले होते. शिवाय लाडूमध्ये नॉयलॉनच्या दोऱ्यांची जाळीही होती. दाणे टिपण्याच्या आशेने आलेले चित्तर पक्षी युरियामिश्रित लाडू खाऊन मरण पावतात, किंवा जाळ्यामध्ये अडकून पडतात. सायंकाळी शिकारी त्यांना ताब्यात घेतात. यापूर्वी काहीवेळा असे प्रकार परिसरात झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीही असेच काही लाडू ठिकठिकाणी टाकले होते. हे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्याने ते नष्ट केले. यामुळे पक्ष्यांचे प्राण वाचले. यादरम्यान, जवळच एका मेंढपाळाच्या शेळ्या-मेंढ्याही शेतात खतासाठी बसल्या होत्या. त्यांनी धान्याच्या आशेने लाडू खाल्ले असते, तर त्यांनाही जीव गमवावा लागला असता. कळपातील २२ पिलांचाही जीव वाचला. अन्यथा मेंढपाळाची मोठी आर्थिक हानी झाली असती.यापूर्वीही असेच कृत्य करणाऱ्या शिकाऱ्यांना शेतात कामाला आलेल्या एका शेतमजूर महिलेने रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी शिकाऱ्यांनी तिला व तिच्या दोन मुलांना शस्त्राचा धाक दाखवून ते पसार झाले होते. त्यानंतर पुन्हा युरियाचे लाडून दिसून आले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी