शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यांच्या तपासाला गती देणार ‘आय बाईक’! सांगली पोलीस दलाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:57 IST

अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, सध्या जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर सहा बाईक कार्यरत राहणार आहेत. उपविभागातील आवश्यकता असलेल्या पोलीस ठाण्यात ही सेवा असेल. बाईकसमवेत दोन प्रशिक्षित कर्मचारी असतील. त्यांच्याकडे स्वतंत्र कीट देण्यात आले आहे. त्याचा उपयोग पंचनामा करण्यात निश्चितपणे होऊ शकेल.

ठळक मुद्देजिल्ह्यात सहा आय बाईक दाखल; जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते यंत्रणा कार्यान्वित

सांगली : जिल्ह्यात घडणा-या गुन्ह्यांची उकल जलदगतीने करण्यासाठी व दुर्गम भागात पंचनाम्यासह इतर तांत्रिक तपासासाठी यंत्रणा पोहोचण्यासाठी आता ‘आय बाईक’ची मदत होणार आहे. गंभीर गुन्ह्यातील भौतिक पुरावे तातडीने संकलित करून तपासाला गती देण्यासाठी जिल्हा पोलीस दलात शुक्रवारपासून सहा आय (इन्व्हेस्टिगेशन) बाईक दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. उपविभागीय स्तरावर असणा-या या दुचाकीसोबत सर्व सुविधा असणार आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी जिल्ह्यात असा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली आय बाईक कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागात गुन्हा घडल्यास तांत्रिक माहितीसाठी पोहोचण्यात अडचणी येत असतात. यावर प्रभावी उपाय म्हणून या उपक्रमाची मदत होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, दुर्गम भागातील गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी या बाईकचा उपयोग होणार आहे. चारचाकी वाहनांपेक्षा लवकर ही बाईक घटनास्थळी पोहोचणार असल्याने पंचनामा व पुराव्यांचे अधिक प्रभावी संकलन होणार आहे. ठराविक कालावधीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, सध्या जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर सहा बाईक कार्यरत राहणार आहेत. उपविभागातील आवश्यकता असलेल्या पोलीस ठाण्यात ही सेवा असेल. बाईकसमवेत दोन प्रशिक्षित कर्मचारी असतील. त्यांच्याकडे स्वतंत्र कीट देण्यात आले आहे. त्याचा उपयोग पंचनामा करण्यात निश्चितपणे होऊ शकेल. यामुळे भविष्यात गुन्ह्याचा तपास लावण्यास गती येईल. रस्ते अपघातातील माहिती संकलनासाठीही याचा उपयोग होणार आहे.

यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गील, संदीप कोळेकर, सहा. पोलीस निरीक्षक जी. व्ही. कांबळे, वाहतूक शाखेचे संजय क्षीरसागर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

१९ कर्मचाऱ्यांची टीम सदैव तत्परया पथकातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळावरुन पुरावे गोळा करणे, जतन करणे, घटनास्थळाचे निरीक्षण, फॉरेन्सिक लॅबला पाठवायचे नमुने घेणे, फिंगरप्रिंट डेव्हलपिंग, सॉफ्टवेअरच्या साहाय्याने हॅशव्हॅल्यू काढणे आदीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. १९ कर्मचाºयांची ही टीम असणार आहे. सहा. पोलीस निरीक्षक दीपाली कालेकर, संदीप लांडगे, संतोष चव्हाण यांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत प्रशिक्षण घेऊन पथकातील कर्मचा-यांनाही प्रशिक्षण दिले आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्तPoliceपोलिस