शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अबब ! बिळाशीत पडली परातीएवढी मोठी गार, ढगफुटीसदृश्य पावसाने ओढे-नाले वाहू लागले

By हणमंत पाटील | Updated: May 24, 2024 13:06 IST

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथे गेले चार दिवस सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी अचानक ...

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथे गेले चार दिवस सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी अचानक मुसळधार पाऊस कोसळत होता. ढगफुटीसदृश्य या पावसाने ओढे-नाले वाहू लागले. याच दरम्यान वीरवाडी येथील शाहीर सुरेश पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे पत्र्यावर मोठी गार आदळली. एवढा मोठा आवाज कशाचा म्हणून घरातील लोक जाऊन बघतात तर काय परातीएवढी मोठी गार..ही गार बघताच उचलून त्यांनी परातीत ठेवली. एवढी मोठी गार पडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सुरेश पाटील म्हणाले, माझ्या सत्तर वर्षांच्या आयुष्यात ही अशी मोठी गार मी पहिल्यांदा पाहिली. ही गार घराच्या छपरावर पडली असती तर छप्पर फोडून ती गार घरात आली असती, परंतु सुदैवाने सदरची गार पाठीमागे उघड्या परड्यात पत्र्यावर आदळली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी व नुकसान झाले नाही. ही गार बघण्यासाठी वीरवाडीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सात किलो वजनाची गार..सुमारे सहा ते सात किलो वजनाची बर्फाची लादी असेल एवढ्या आकाराची ही गार होती. पाऊस थांबल्यानंतर बराच वेळ ही गार पाहण्यासाठी लोक येत होते. तासाभराने ही गार विरघळून गेली. परंतु या गारीची परिसरात चांगली चर्चा सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस